(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी’ चे लोकार्पण | मराठी १ नंबर बातम्या
" />

‘प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी’ चे लोकार्पण

मुंबई ( १० ऑक्टोबर २०१८ ) : प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरीतून मुंबईच्‍या प्रिन्‍स नेक्‍लेसचे दिसणारे विहंगम दृश्‍य डोळयाचे पारणे फेडणारे असून मुंबईकरांनी त्‍याचा आनंद घ्‍यावा, असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्‍य ठाकरे यांनी केले.

मलबार हिल येथील ‘ प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी’ चे लोकार्पण युवा सेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्‍य ठाकरे व मुंबईचे महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा हस्‍ते बी.जी. खैर मार्गावरील, कमला नेहरु उद्यानालगतच्‍या ‘ प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी’ येथे आज (१० ऑक्टोबर, २०१८) सायंकाळी पार पडले, त्‍यावेळी प्रसार माध्‍यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.

याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्‍थापत्‍य समिती (शहर) अध्‍यक्षा अरुंधती दुधवडकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्‍यक्ष अतुल शहा, स्‍थानिक नगरसेविका जोत्‍स्‍ना मेहता, उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) प्रकाश कदम, उप आयुक्‍त (परिमंडळ – १) हर्षद काळे, जल अभियंता अशोक तवाडिया, प्रमोद नवलकर यांच्‍या सुविध पत्‍नी तसेच महापालिकेचे संबंधि‍त अधिकारी उपस्थित होते.

या गॅलरीचे वैशिष्‍टय म्‍हणजे दिव्‍यांगसाठी विशेष सुविधा, मलाड स्टोनमध्‍ये बांधकाम, स्‍टि‍ल व मोझेक काचेचे संरक्षक कठडे, काचेचे पारदर्शी उद्ववहन, फ्लड लाईटची सुविधा, अॅम्‍पी थेयिटरची सुविधा आदी सुविधांनी परिपूर्ण ही वास्‍तु बृहन्‍मुंबई महापालिकेने उभारली आहे.

प्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फि‍त कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करुन लोकार्पण करण्‍यात आले. यानंतर मान्‍यवरांनी टेलिस्‍कोपमधून मुंबईचे विहंगम दृश्‍य बघि‍तले.याप्रसंगी संबधित विभागाच्‍या वतीने सादरीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिकांची उपस्थिती होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget