(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अमृतसरमधील रावण दहन आयोजकांवर मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करा - भीम आर्मीची मागणी | मराठी १ नंबर बातम्या
" />

अमृतसरमधील रावण दहन आयोजकांवर मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करा - भीम आर्मीची मागणी

मुंबई ( २० ऑक्टोबर २०१८ ) : पंजाबमधील अमृतसर जोडा फाटक येथे रावण दहनदरम्यान झालेल्या अपघातप्रकरणी संबंधित आयोजकांवर मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करावेत मृतांना १० लाख रुपये जखमींना ५ लाख रुई तसेच शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशा मागण्या भीम आर्मी या सामाजिक संघटनेने पंजाब सरकारकडे केली आहे . लोकांच्या जीविताशी खेळणारी हि प्रथा त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणीही या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे.

काल अमृतसर राज्यातील जोडा रेल्वे फाटक मैदान येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता . या कार्यक्रमादरम्यान रावण दहन होत असताना होणारा फटाक्यांचा प्रचंड आवाज आणि झालेल्या गर्दीच्या गोंगाटात काहीच कळून न आल्यामुळे रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या लोकांना रेल्वेने उडवले . या अपघातात ५९ च्यावर लोक मृत झाले असून ५७ लोक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अपघाताची तीव्रता लक्षात घेता २०० च्यावर हा आकडा जाण्याची शक्यता आहे . या अपघातात रावणाची भूमिका करीत असलेला दलबीर सिंग हादेखील दगावला असून त्याच्यामागे आई, पत्नी आणि ८ महिन्याची मुलगी आहे.

रावणाला खलनायक ठरवून आदिवासी समाज पूजा करीत असलेल्या रावणाची प्रतिमा दहन करण्याची अनिष्ठ प्रथा राज्यासह देशात सुरु असून ती बंद करण्यात यावी यासाठीभीम आर्मीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री ,पर्यावरण मंत्री , जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक आदींना यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता , हि अनिष्ट प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणीदेखील या संघटनेने केली होती.

अमृतसर येथील विदारक घटना लक्षात घेता आम्ही केलेल्या मागणीला बळ मिळत असून अमृतसर येथे निष्काळजी बाळगणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासह भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३ (अ), २९५, २९८, नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,. पंजाब सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये व सरकारी नोकरी द्यावी जखमींना ५ लाख रुपये व उपचारांचा खर्च द्यावा . व भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून रावण दहनाला कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशा मागण्या भीम आर्मीने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे केल्या आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget