(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); श्री गणेश गौरव पुरस्कार – २०१८ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न | मराठी १ नंबर बातम्या
" />

श्री गणेश गौरव पुरस्कार – २०१८ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

मुंबई ( २३ ऑक्टोबर २०१८ ) : ‘स्वच्छ मुंबई हरित मुंबई हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न असून या दृष्टीने आपण सर्वजण सतर्क व सुज्ञ आहात. गणेशोत्सव मंडळांनी साकारलेल्‍या देखाव्‍यांतून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती यावर्षी साकारण्यात आल्या होत्या. यासोबत सामाजिक प्रबोधनाचा संदेशही दिला गेला आहे, गणेशोत्सव मंडळांनी मोठयाप्रमाणात पर्यावरण विषयक बाबींवर अधिक लक्ष्य केंद्रीत करावे, असे आवाहन मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्यावतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव पुरस्कार – २०१८’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली महापालिका सभागृह, महापालिका मुख्यालय, मुंबई येथे आज (दिनांक २३ ऑक्टोबर, २०१८) सायंकाळी पार पडला, यावेळी ते बोलत होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यात उप महापौर हेमांगी वरळीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी स्थापत्य समिती अध्यक्षा (शहर) श्रीमती अरूंधती दुधवडकर, विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे, नगरसेवक / नगरसेविका, उपआयुक्त (परिमंडळ - २) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बरडे, विविध प्रभागांचे सहाय्यक आयुक्त, स्पर्धेचे परीक्षक, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.

महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, सन – १९८८ पासून श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा’ आयोजित करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका पुरवित असलेल्या सेवा-सुविधांविषयी म्हणजेच पाणी वाचवा, शहर स्वच्छ व सुंदर ठेवा, पर्यावरण रक्षण, वर्षा जलसंचयन, वृक्षारोपण व वृक्षसंरक्षण, अवयवदान, स्मार्ट सिटी, प्लास्टिक बंदी, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती इत्यादी विषयांचा परामर्श देखाव्याद्वारे घेऊन लाखो नागरिकांचे जनप्रबोधन करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे करीत आहेत, त्यांचे महापौरांनी अभिनंदन केले. बृहन्मुंबईतील ७४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या सर्वांचेच त्यांनी अभिनंदन केले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल हे आपल्‍या प्रास्‍ताविकपर भाषणात म्हणाले की, मुंबई महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव हा निव्वळ भव्यदिव्य नाही तर, साऱया जगाला आकर्षणाचा भाग झाला आहे. यावर्षी परदेशी पर्यटकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेला होता. या कक्षाला परदेशी पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला.

घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरुपाच्या गणेशोत्सवांना आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा महापालिकेद्वारे पुरविण्यात येतात. गणेश मंडळांना ऑनलाईन परवाने देणे, गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुलभपणे व्हावे म्हणून रस्त्यांची निगा राखणे, यापासून ते विसर्जन स्थळांवर सारी व्यवस्था महापालिकेद्वारे करण्यात येते. साऱया मुंबईकरांप्रमाणेच महापालिकाही गणेशोत्सवाच्या परिपूर्ण आयोजनात स्वतःला वाहून घेऊन गणेशोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी झटत असल्‍याचे त्‍यांनी यावेळी नमूद केले.

यावर्षी बृहन्मुंबईत एकूण सुमारे २ लाख ३५ हजार ३७२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी महानगरपालिकेने यंदाही ठिकठिकाणी मिळून एकूण ३२ कृत्रिम तलाव तयार केले होते. या कृत्रिम तलावांत एकंदर २४ हजार ५८४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले, अशी माहितीही सिंघल यांनी दिली. पुरस्‍कारप्राप्‍त गणेश मंडळांचे त्‍यांनी अभिनंदनही केले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे गिरीष वालावलकर म्हणाले की, गणेशोत्सव यशस्वी करण्याकरीता महापालिकेची मोठी यंत्रणा राबवली होती. यंदा ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारुन ती परवानगी देण्याचे काम महापालिकाने यशस्वीप्रकारे केले आहे. निर्विघ्‍नपणे गणेशोत्‍सव सोहळा पार पडल्‍याबद्दल महापालिका प्रशासनाला त्‍यांनी धन्‍यवाद दिले.

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सुरेश सरनोबत याप्रसंगी म्हणाले की, गणेशोत्‍सव मंडळांना विविध प्रकारच्‍या सेवा-सुविधा मिळण्‍यासाठी समन्‍वय समिती नेहमी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असते. तसेच महापालिका प्रशासन देखील आमच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत असते.

परीक्षकांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना प्रकाश बाडकर म्हणाले की, सहभागी एकूण ७४ पैकी १७ मंडळांची अंतिम फेरीकरीता निवड झाली. सर्वानुमते चर्चा होऊन या स्पर्धेचा निकाल अत्यंत बारकाईने निश्चित करण्यात आला. कोणत्याही मंडळावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतानाच परीक्षकांचीच जणू परीक्षा घेण्यात आली होती. मूर्तीची जडणघडण ते सजावट, समाज प्रबोधनाचे कार्य, दृश्यकला हे सर्वंच मुद्दे लक्षात घेऊन विजेते ठरविण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महापालिकेच्या संगीत कला अकादमीच्या चमूने वंदेमातरम, स्वागतगीत आणि गणेशगीत सादर केले. रवींद्र काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल याप्रमाणेः-

  •  

प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-) :       स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, मॉडेल टाऊन, ग्लोरिया सोसायटीजवळ, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई  ४०० ०५३.

  •  

द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-)       शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर श्री गणेश मंडप, प्रेमनगर, पोलीस चौकीपासून आतमध्ये, कांजूरगाव (पूर्व), मुंबई  ४०० ०४२.

  •  

तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-)       गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश मैदान,

गं. द. आंबेकर मार्ग, मुंबई  ४०० ०३३.

  •  

सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु.२५,०००/-)  सतिश गिरकरश्री गणेश क्रीडा मंडळ, जाधव चाळ, काजुवाडी,

सामराज हॉटेलजवळ, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई.

  •  

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (रु.२०,०००/-)  स्‍वप्‍नील नाईकताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शेठ मोतीशाह लेन, माझगांव, मुंबई  ४०० ०१०.

  •  

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-)१) नवतरुण मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्‍सव, गांवदेवी नगर, गांवदेवी मंदीर, कोंकणीपाडा, दहिसर (पूर्व), मुंबई  ४०० ०६८.२) श्री हनुमान सेवा मंडळ, हनुमान मंदीर सभागृह, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग, धारावी, मुंबई  ४०० ०१७.

  •  

शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती  पारितोषिके (रु.२५,०००/-)पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, २/००८ पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग,

मुंबई  ४०० ०१३.

  •  

प्‍लास्‍टीक बंदी / थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-)१) महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गं. द. आंबेकर मार्ग,

परळ, मुंबई  ४०० ०१२.२) साईराज गणेशोत्सव मंडळ, न्यु कलईवाला चाळ, शहाजी राजे मार्ग,

विलेपार्ले (पूर्व), मुंबई  ४०० ०५७.

  •  

अवयवदान जागृतीः पारितोषिक रु.१५,०००/-बाल मित्र कला मंडळ, १ विजया हॉकर्स, स्टेशन मार्ग, विक्रोळी (पश्चिम),

मुंबई  ४०० ०८३. 

 
प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे -

उत्‍कृष्‍ट मूर्तिसाठीः

१. इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,

शंकर कवडे चाळ, संत कक्कया मार्ग, धारेश्वर मंदीर, धारावी,

मुंबई  ४०० ०१७.२. पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, (राणीबागचा राजा)

अनंत गणपत पवार लेन, २ राणीबाग, मुंबई  ४०० ०२७.३. शास्‍त्री नगर सार्वजनिक श्री. गणेशोत्सव मंडळ, शास्‍त्री नगर मनोरंजन मैदान, शास्‍त्री नगरगोरेगांव (पश्‍चि‍म), मुंबई  ४०० १०४.

नेपथ्यासाठीः

१. अंधेरीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश चौक,

डी. एन. नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई  ४०० ०५३.२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाकोलायशवंत नगर,

सांताक्रुझ (पूर्व) मुंबई  ४०० ०५५.३. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क, गणेश मंदिर मार्ग, कस्तुरपार्क, बोरिवली (पश्चिम), मुंबई  ४०० ०९२.४. पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवाजी मैदान, पार्कसाईट,

विक्रोळी (पश्चिम), मुंबई  ४०० ०७९.

प्रबोधनासाठीः

१. बाळ गोपाळ मित्रमंडळ, (विलेपार्ल्यांचा पेशवा),

सिद्धीविनायक सोसायटी, श्रद्धानंद मार्ग, विस्तारित आझाद मार्ग,

विलेपार्ले (पूर्व), मुंबई  ४०० ०५७.२. मापलावाडी सार्वजनिक उत्‍सव मंडळ८६मापलावाडी,

शेठ मोतीशाह लेन, माझगांव टेलिफोन एक्‍सचेंजसमोरमाझगांव,

मुंबई  ४०० ०१०.३. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरगाव (पूर्व), एसबीआय कांजूर शाखाकांजूर शिवसेना शाखाकांजूर मार्ग (पूर्व)मुंबई  ४०० ०४२.४. श्री गोलदेऊळ सार्वजनिक उत्सव मंडळ, पहिली भंडारी स्ट्रीट (गोलदेऊळ), गिरगांव, मुंबई  ४००००४.५. रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री रामदूत हनुमान मंदिराशेजारी, घाटकोपर (पूर्व), मुंबई  ४०० ०७७.

पर्यावरणः

१. बाळ मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ल्याचा गणराज,

विठ्ठलवाडी, दयालदास मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई  ४०० ०५७.

२. जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रामजी लल्लू कंपाऊंड,

काळा मारुती मंदिरासमोर, महात्मा गांधी मार्ग, कांदिवली (पश्चिम), मुंबई  ४०० ०६७.

३. शिवडी मध्‍यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (शिवडीचा राजा), प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगणशिवडी (पश्चिम), मुंबई  ४०० ०१५.

सामाजिक कार्यासाठीः

१. धी वरळी आंबेडकर नगर सारर्वजनिक गणेशोत्सव मंडळ,

धी वरळी आंबेडकर नगर को.ऑप.हौ.सोसा. वरळी, मुंबई  ४०० ०१८.२. दुर्वांकुर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सी विंगटॅरेस प्‍लॉट,

दुर्वांकुर गृहनिर्माण स. संस्‍था म.दादोजी कोंडदेव मार्ग,

राणीबागभायखळा (पूर्व), मुंबई  ४०० ०२७.३. सार्वजनिक गणेशोत्सव समिती, सिद्धीविनायक  सभागृह,

इमारत क्रमांक ५७ जवळकन्नमवार नगर  १, विक्रोळी (पूर्व),

मुंबई  ४०० ०८३.
***


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget