(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबईतील सुका कचऱयावर प्रक्रि‍या करण्‍यासाठी जागतिक स्‍तरावर निमंत्रण | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुंबईतील सुका कचऱयावर प्रक्रि‍या करण्‍यासाठी जागतिक स्‍तरावर निमंत्रण

मुंबई ( २४ ऑक्टोबर २०१८ ) : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे पायाभूत सुविधा व नागरिकांमध्‍ये जागरुकता या दोन्‍ही स्‍तरावर प्रयत्‍न होत असून ओला व सुका कचरा विलगीकरण करण्‍यासाठी तसेच सुका कचऱयावर प्रक्रिया करुन विल्‍हेवाट लावण्‍यासाठी दिनांक २० नोव्‍हेंबर २०१८ पर्यंत जागतिक स्‍तरावर ‘अभिरुची स्‍वारस्‍य अर्ज’ मागविण्‍यात आले आहेत.

मुंबईमध्‍ये दररोज आठशे ते एक हजार मे. टन इतका सुका कचरा निर्माण होतो. सुका कचरा विल्‍हेवाटी संदर्भात निरनिराळे तंत्रज्ञान, प्रक्रिया क्षमता, अनुभव, यंत्रणा इत्‍यादी निकष ठेवून खाजगी संस्‍थेची या कामासाठी नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे. सुका कचरा प्रक्रियेसाठी महानगरपालिकेच्‍या वतीने नियुक्‍त झालेल्‍या संस्‍थेला भूखंड उपलब्‍ध करुन दिला जाईल. ज्‍यामध्‍ये सुरक्षा गार्डन – कुलाबा, देवनार, मालवणी इत्‍यादी भूखंडाचा समावेश आहे. सुका कचरा संकलन, प्रक्रि‍या स्थळापर्यंत वाहन व त्‍यासाठी आवश्‍यक प्रणाली विकसित करण्‍याची जबाबदारी खाजगी संस्‍थेची असेल. तसेच गृहनिर्माण संस्‍थेमधून/ व्‍यावसायिक संस्‍थेमधून निर्माण झालेला सुका कचरा प्रक्रि‍या केंद्रापर्यंत वाहून आणल्‍यानंतर त्‍याचे तद्नंतर प्‍लॉस्‍टीक, कागद, धातू इत्‍यादी मध्‍ये वर्गीकरण त्‍यावर प्रक्रि‍या/पुनःवापर करण्‍याची जबाबदारी संबंधीत संस्‍थाची राहील. सदर संस्‍थेच्‍या नियुक्‍तीव्‍दारे मुंबईमध्‍ये निर्माण होणाऱया सुक्‍या कचऱयावर प्रतिदिन प्रक्रि‍या /पुनःवापर शंभर मे. टन पासून २५० टनापर्यंत विस्‍तारित क्षमता असणे अपेक्षित आहे.

नियोजित पद्धतीने सुका कचरा संकलन करण्‍यासाठी संकेतस्‍थळ, टोल फ्री (हेल्‍पलाईन क्रमांक), तक्रार निवारण प्रणाली इत्‍यादी नियुक्‍त झालेल्‍या खाजगी संस्‍थेने करणे आवश्‍यक आहे. जेणेकरुन मुंबईमधील नागरिकांच्‍या सदर विषयातील अडचणी दूर करणे शक्‍य होईल. सदर कामासाठी इच्‍छुक व सक्षम असलेल्‍या संस्‍था आपले प्रस्‍ताव मुंबई महानगरपालिकेकडे सादर करु शकतील.

महानगरपालिकेद्वारे दिनांक ०३ नोव्‍हेंबर २०१८ रोजी बैठक आयोजित करण्‍यात आली असून ज्‍यामध्‍ये प्रस्‍ताव सादर करण्यासंबंधी काही अडचणी असल्‍यास त्‍याचे निराकरण करण्‍यात येईल. दिनांक २० नोव्‍हेंबर २०१८ नंतर नियुक्‍त केलेल्‍या मुल्‍यांकन समितीसमोर प्रस्‍तावांचे सविस्‍तर सादरीकरण केले जाईल व निर्णय घेतले जातील. खाजगी संस्‍थेच्‍या कामाची व्‍याप्‍ती, निवडीचे निकष, आवश्‍यक कागदपत्रे इत्‍यादी सविस्‍तर माहिती महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget