मुंबई ( २३ ऑक्टोबर २०१८ ) : चंद्रपूर शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे. या पुलासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय जमिनीवरील 42अपात्र अतिक्रमणधारकांना एकरकमी मोबदला देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारकांना चंद्रपूर महापालिकेकडून मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा निधी देण्यात येणार नाही. हा निर्णय केवळ एकवेळची विशेष बाब म्हणून लागू असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा