(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय ( 23 ऑक्टोबर 2018) : विदर्भ-मराठवाड्यातील 44 शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन मिळणार | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय ( 23 ऑक्टोबर 2018) : विदर्भ-मराठवाड्यातील 44 शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन मिळणार

मुंबई ( २३ ऑक्टोबर २०१८ ) : मराठवाडा आणि विदर्भातील निवडक 10 जिल्ह्यातील शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मराठवाड्यातील17 आणि विदर्भातील 27 अशा एकूण 44 शेतकरी गटांना लाभ होणार आहे.

या योजनेंतर्गत शासनाकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून 10 टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे. एका गटासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 6 लाख उपलब्ध करण्यात आले आहेत. या माध्यमातून पाच शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या गटाला एक वाहन देण्यात येणार आहे. तसेच मासेमारांकडून शेतकरी गटांना मासे उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त हे समन्वय साधणार आहेत. शेतकरी गटाच्या सदस्यांना मासे हाताळणे, त्यांचे शीतपेटीत जतन करणे आणि त्यांच्यावर प्रक्रिया करणे याबाबतचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर देण्यात येणार आहे. या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी गटांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget