मुंबई ( २८ ऑक्टोबर २०१८ ) : छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जय जयकार करण्यापेक्षा आपल्या आसपासच्या किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धनाचे काम आपण स्वतः हाती घेतले पाहिजे, हेच तरुण पिढीने सांगण्याचा प्रयत्न आज धारावी येथील काळा किल्ल्याच्या स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेतून केलेला आहे.
धारावी येथील काळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी संगम प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमात किर्ती कॉलेजच्या एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी हातभार लावला.
रविवारी ( २८ ऑक्टोबर २०१८ ) सकाळी 9.30 वाजल्यापासून काळा किल्ल्यावर स्वछता मोहीम राबविण्याचे काम संगम प्रतिष्ठानच्या स्वयंमसेवकानी हाती घेतले. या कामात कीर्ती महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले.
या मोहिमेला पुरातत्व विभाग आणि मुंबई महानगरपालिकेचे मार्गदर्शन व स्थानिक नगरसविका गंगा कुणाल माने यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
दरम्यान, गेली 26 आठवडे सायन किल्ल्यांची स्वछता आणि संवर्धन करण्याचे काम संगम प्रतिष्ठानने केले. आता 11आठवड्यात सर्वांच्या सहकार्याने काळा किल्ल्याचा कायापालट करु, असा विश्वास संगम प्रतिष्ठानच्या स्वयंमसेवकाने व्यक्त केला. सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा आपल्या आसपास किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा