(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्येमहाराष्ट्रातील 26 महिला उद्योजिका होणार सहभागी | मराठी १ नंबर बातम्या
" />

‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्येमहाराष्ट्रातील 26 महिला उद्योजिका होणार सहभागी

नवी दिल्ली ( २२ ऑक्टोबर २०१८ ) : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील 26 महिला उद्योजिका सहभागी होणार आहेत.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी दिनांक 26 ऑक्टोबरला होणार आहे. देशभरातील 500 महिला उद्योजिका या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.

सेंद्रीय शेती करणा-या महिला शेतकरी व महिला उद्योजकांस प्रोत्साहन देण्यासाठी या मेळयाचे आयोजन मागील चार वर्षापासून करण्यात येत आहे. महिला उद्योजकांस योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांचे सक्षमीकरण व्हावे, महिला उद्योजकांसाठी अधिकाधिक संधीची दारे उघडावीत हा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे.

महाराष्ट्रामधून नंदुरबार(4), जळगाव(4), नागपूर(2), भंडारा(1), अमरावती(2), यवतमाळ(4), औरंगाबाद(1), हिंगोली(1), बीड (1), मुंबईतून (4) महिला उद्योजिका सहभागी होणार आहेत. यासह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॉनिक फारमर्स यांचाही सहभाग असणार आहे. महाराष्ट्रामधून येणा-या महिला उद्योजक प्रदर्शानामध्ये डाळी, हळद, मसाले, औषधीयुक्त काळे तांदूळ, पारपांरिक तांदूळ, तेलबिया, केळीचे चिप्स, अचार, नागलीचे विविध खाद्य पदार्थ, चिक्की, बेसनाचे लाडू अंबाडी, फुले, गवती चहा, तरोटा कॉफी, बेबी बॉडी वॉश, बॉडी क्रिम, लीप बाम, मालीश तेल, हॅन्डवॉश, असे विविध वस्तु तसेच पदार्थ येथे विक्रीसाठी प्रदर्शित केले जाणार आहेत. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यत असणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget