मुंबई (२१ डिसेंबर २०१८) : विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात २० डिसेंबर २०१८ रोजी वार्षिक सांस्कृतिक कॉलेजियम हा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केला होता. परंतु कार्यक्रम विद्यार्थी क्षमतेच्या तुलनेत अपुऱ्या जागेत आयोजित केल्यामुळे मोठी गर्दी होऊन चेंगराचेंगरीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना दुखापत झाली. त्यामध्ये १२ विद्यार्थ्यांना शासकिय कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या प्रकारास महाविद्यालयाचे व्यवस्थापन व प्राचार्य जबाबदार असून त्यांच्यावर विद्यापीठाने महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करावी व महाविद्यालयास मिळालेला स्वायत्तता दर्जा रद्द करण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय दिल्ली यांच्याकडे शिफारस करावी, असे निवेदन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बिरुड यांना मनविसेचे अध्यक्ष अदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठ अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष ऍड.संतोष धोत्रे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मुंबई विद्यापीठ सरचिटणीस संतोष गांगुर्डे यांनी दिले. कुलसचिवानी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन विद्यापिठाकडून समिती नेमून चौकशी करण्यात येईल व योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
टिप्पणी पोस्ट करा