(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आंतरराष्ट्रीय शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव | मराठी १ नंबर बातम्या
" />

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आंतरराष्ट्रीय शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव

मुंबई (११ डिसेंबर २०१८) : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे संबोधण्यात येणार आहे, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानके प्राप्त करणाऱ्या शाळा असाव्यात या हेतूने शासनातर्फे 100 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा स्थापन करण्याचा निर्णय 14 डिसेंबर 2017 रोजी घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाला प्रतिवर्ष 10 वर्षांसाठी 10 कोटी एवढा निधी सहाय्यक अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मंडळाच्या आवश्यकतेप्रमाणे कंत्राटी तत्त्वावर अधिकारी, कर्मचारी, तज्ज्ञ उपलब्ध करुन घेणे आणि खर्चाबाबतचे अधिकार मंडळास प्रदान करण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक नियमावली व सेवा शर्ती शासन मान्यतेने ठरविण्याचे अधिकार मंडळाला दिले आहेत. ही प्रक्रिया होईपर्यंत शासनाचे प्रचलित नियम विचारात घेऊन कार्यवाही केली जाणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget