(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ३८४ शहरातील १९.४० लक्ष घरकुलांच्या बांधणीचे उद्दिष्ट | मराठी १ नंबर बातम्या
" />

३८४ शहरातील १९.४० लक्ष घरकुलांच्या बांधणीचे उद्दिष्ट

महामंडळाच्या सहअध्यक्ष पदी राजेंद्र मिरगणे यांची नियुक्ती

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांना गती मिळण्यासाठी

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

मुंबई (१३ डिसेंबर २०१८) : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत राज्यात सुरु असलेल्या घरकुलांच्या बांधकामांना गती मिळावी. निश्चित केलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी अलिकडेच मंत्रिमंडळाने
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ३८४ शहरांमध्ये सुरु असलेल्या १९.४० लक्ष घरकुलांच्या बांधणीला गती येणार आहे. या महामंडळावर नामनिर्देशित करावयाच्या सहअध्यक्ष या पदावर राजेंद्र सुखदेव मिरगणे यांची नियुक्ती केली आहे.

या महामंडळाची कार्ये, उद्दिष्ट्ये आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या असून त्यात राज्यशासनाच्या पुर्वमान्यतेने परवडणाऱ्या घरांच्या मोठया प्रकल्पाची उभारणी करण्याकरीता योजना तयार करणे, आर्थिकदृष्टया दृबल घटक, अल्प उत्पन गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्याकरीता सन २०२२ पर्यत ५ लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करायची आहे, प्रत्येक प्रकल्प हा किमान ५ हजार घरकुलांचा असणार आहे.

तसेच केंद्र शासन आणि राज्य शासनाने तरतुदी केल्यानुसार स्व:खर्चाने किंवा खाजगी विकासकांच्या संयुक्त सहकार्याने मोठया प्रकल्पाची उभारणी करणे, ज्यामध्ये ३० टक्के आर्थिक दृष्टया दुर्बल, ३० टक्के अल्पउत्पन्न गट आणि ४० टक्के मध्य उत्पन्न गटातील घरकुलांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर महाहाऊसिंगच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरीता आवश्यक निधीची उभारणी करणे, विविध प्रशासकीय तथा तांत्रिक कारणास्तव
रखडलेल्या प्रकल्पांच्या मान्यतेस चालना देणे, नगररचना अधिनियमानुसार नविन परवडणाऱ्या घरांच्या वसाहती विकसित करणे तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांचा एकत्रित शहर विकास आराखडा आणि केंद्र व राज्यशासनाच्या इतर योजनांशी सांगड घालावी लागणारआहे.

या गृहनिर्माण विकास महामंडळाला महाहाऊसिंगच्या मालकीच्या व महामंडळाशी सलग्न जमिनी, घरे आणि इमारतीचे संरक्षण व व्यवस्थापन करावे लागणार असून महामंडळाने ठरवून दिलेल्या उदिष्टांची पुर्तता करिता
संसाधनाची उभारणी करुन योग्य संसाधनाचे वाटप करावे लागणार आहे. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी अभिनव प्रतिमान आणि तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देऊन त्रिपक्षीय सल्लागारांच्या सहकार्याने घरांच्या
गुणवत्तेची खातरजमा करावी लागणार आहे.

तसेच पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचे वितरण, योग्य आणि पारदर्शकपणे होत असल्याबाबत खात्री करणे, जलद आणि टिकाऊ परवडणाऱ्या घरांच्या उभारणीकरिता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ही सर्व कामे
जलद गतीनेआणि वेळेत पार पाडण्यासाठी आवश्यक निधीची उभारणी, या नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाला करावी लागणार आहे.

या महामंडळासाठी म्हाडा, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण, शिवशाही पुर्नवसन प्रकल्प व अन्य इच्छुक शासकीय संस्थामार्फत प्रत्येकी १०० कोटी रुपयांची गुतंवणूक असणार आहे. तसेच खुल्या बाजारातून भांडवल
उभारण्याची, बँका आणि अन्य वित्तीय संस्थाकडून कर्जे उभारण्याची या महामंडळाला परवानगी असणार आहे. हे महामंडळ नोंदणी कायद्यांतर्गत कंपनी असणार असून या महामंडळाचे कामकाज हे नियोजन, विकास, वित्त व अन्य क्षेत्रातील तज्ज्ञामार्फत पार पाडले जाणार आहे. महामंडळाचे मुख्यालय नवी मुंबई असणार असून महामंडळाचे कार्यक्षेत्र हे संपुर्ण महाराष्ट्र असणार आहे. या महामंडळाचा कालावधी हा सन २०२२ पर्यत किंवा प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) सुरु असेपर्यत राहणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना राज्यातील ३८४ शहरांमध्ये राबविण्यास केंद्र सरकाने मान्यता दिलेली असुन २०२२ पर्यत १९.४० लक्ष घरकुलांच्या बांधणीचे उदिष्ट निश्चित केलेले आहे. या महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असुन गृहनिर्माण मंत्री अतिरिक्त अध्यक्ष आहेत. एक अशासकीय सदस्य सहअध्यक्ष असुन संचालक म्हणुन अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण), प्रधान सचिव(नवी-२) म्हाडाचे उपाध्यक्ष, झोपूचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवशाही पुर्नवसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक, सभापती नागपूर सुधार प्रन्यास, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, सिडकोचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन अशासकीय सदस्य उद्योगक्षेत्रातील दोन तज्ज्ञ काम पाहणार आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम करणार आहेत. या महामंडळावर नामनिर्देशित करावयाच्या सहअध्यक्ष या अशासकीय पदावर राजेंद्र सुखदेव मिरगणे यांची नियुक्ती केलेली आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे
आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन्याबाबतचा शासननिर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक २०१८१२१११२१३०५२८०९असा आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget