(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); निलंगा तालुक्यातील सावनगिरा येथील प्रगती सोळुंके ह्या विद्यार्थ्यांनीला पहिलं मराठा जात प्रमाणपत्राचा मान | मराठी १ नंबर बातम्या
" />

निलंगा तालुक्यातील सावनगिरा येथील प्रगती सोळुंके ह्या विद्यार्थ्यांनीला पहिलं मराठा जात प्रमाणपत्राचा मान

लातूर (१४ डिसेंबर २०१८) : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश शासनाने सर्व यंत्रणेला दिले. त्याचाच एक भाग म्हणून कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा तालुक्यातील १६ युवकांना आज मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करून मराठा जात प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निलंगेकर यांच्या हस्ते प्रगती सोळुंके (सावनगिरा ता.निलंगा) या विद्यार्थ्यांनीस लातूर जिल्ह्यातून मराठा जातीचे पहिले जात प्रमाणपत्र मिळण्याचा मान मिळाला.

महाराष्ट्र शासनाने प्रथमच अधिसूचना काढून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठ्या प्रमाणात अधिकारी भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली असून त्यात मराठा समाजासाठी आरक्षित जागा दिल्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या युवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. निलंगा मतदारसंघात मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून मराठा जातीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या त्याचाच एक भाग म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात प्रगती सोंळूके (सावनगिरा), उमेश सोंळूके (सावनगिरा), जयश्री जाधव (दापका), शुभम माने (अनसरवाडा), नामदेव सूर्यवंशी (माकणी), शिवनंदा आरीकर (निलंगा), माधव सुभेदार (निलंगा), वासूदेव कदम (खडकउमरगा) अशा १६ विद्यार्थ्यांना मराठा जातप्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय आधिकारी विकास माने, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सौदागर तांदळे, दगडू सोंळूके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासनाचा ऐतिहासिक निर्णय असून हे आरक्षण सर्व कायदेशीर बाबीचा अभ्यास करून देण्यात आले आहे. या आरक्षणाचा समाजातील विद्यार्थी तसेच तरूण युवकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget