(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांचा मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये घेतला आढावा | मराठी १ नंबर बातम्या
" />

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांचा मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये घेतला आढावा

मुंबई (११ डिसेंबर २०१८) : स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आज मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये आढावा घेण्यात आला. महामंडळाने मराठा समाजासाठी नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागण्यासंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी समितीचे सदस्य तथा कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील आदी उपस्थित होते.

महामंडळाने यापूर्वी जाहीर केलेल्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये सहकारी बँकांना राज्य शासनाची हमी देण्यासंदर्भात पत्र पाठविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या योजनेतून आतापर्यंत 76 कोटी 57 लाख 72 हजार 157 रुपयांचे कर्ज मराठा समाजातील तरुणांनी घेतले असून या योजनेतील तरुणांना व्याज परतावा सुरू झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महामंडळाने समाजातील तरुणांना आणखी योजना सुरू करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी यावेळी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget