मंत्रिमंडळ निर्णय (27 डिसेंबर 2018) : किवळा साठवण तलावाचे काम आता जलसंपदा विभागामार्फतच

मुंबई (२७ डिसेंबर २०१८) : शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या नांदेड शहरानजीकच्या किवळा साठवण तलावाचे काम जलसंपदा विभागामार्फत करण्यास आज झालेल्या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शंकररावजी चव्हाण ‍विष्णुपुरी प्रकल्पास काही अटींच्या अधीन राहून 2982 कोटी 24 लाख इतक्या किंमतीस पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत किवळा साठवण तलावाचा समावेश आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेतील अटीनुसार किवळा साठवण तलावाचा उपयोग शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीसाठी होणे अपेक्षित असल्याने या तलावाचा संपूर्ण खर्च संबंधित विभागाने करणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागाच्या निधीतून त्यासाठी कोणताही खर्च करता येणार नव्हता. मात्र, या तलावाचे काम जलसंपदा विभागाच्या निधीमधून करण्याच्या आवश्यकतेबाबतचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भातील अट रद्द करण्यासह किवळा साठवण तलावाचे बांधकाम जलसंपदा विभागाच्या निधीमधून करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सुधारित प्रशासकीय मान्यतेमधील घटकनिहाय तरतुदींनुसार या तलावासाठीचा 43 कोटी 76 लाख इतका खर्च जलसंपदा विभागामार्फत करण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget