(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग | मराठी १ नंबर बातम्या
" />

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगमुंबई (१९ डिसेंबर२०१८) : राज्यात १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्ती वेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय तसेच त्याप्रमाणे त्यांच्या सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्रालयात वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, वित्त विभागाचे सचिव नितीन गद्रे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

हा निर्णय घेण्यात आल्याने शासनावर थकबाकीपोटी २ हजार २०४ कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याने दरवर्षी ३१९ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. २००६ पासून च्या थकबाकीपोटी लागणारी २ हजार २०४ कोटी रुपयांची रक्कम सेवानिवृत्तीवेतनधारकांना/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना एक रकमी मिळणार आहे. याचा लाभ १ लाखाहून अधिक सेवानिवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना होईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget