(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान | मराठी १ नंबर बातम्या
" />

पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान

मुंबई, दि. 27 (रा.नि.आ.) : कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी: राजापूर (जि.रत्नागिरी)- 6अ, आळंदी (पुणे)- 9अ, फलटण (सातारा)- 12अ, दुधनी (सोलापूर)- 2ब, पन्हाळा (कोल्हापूर)- 8क, दिंडोरी (नाशिक)- 15, यावल (जळगाव)- 1अ, बीड- 11अ, बुलढाणा- 12ब, अर्जुनी (गोंदिया)- 14, गोरेगाव (गोंदिया)- 14.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget