(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय ( 11 डिसेंबर 2018) - कुलगुरु शोध समिती सदस्यांच्या निकषात बदल | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय ( 11 डिसेंबर 2018) - कुलगुरु शोध समिती सदस्यांच्या निकषात बदल

मुंबई (११ डिसेंबर २०१८) : ज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियमात बदल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक किंवा त्यांच्या ऐवजी त्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा समावेश कुलगुरु शोध समितीमध्ये करता येणार आहे.

दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर तातडीने योग्य व्यक्तीच्या नेमणुकीसाठी शोध समितीची स्थापना आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियम 1983 च्या कलम 17 (1) नुसार कुलपतींकडून तीन सदस्यीय शोध समितीची स्थापना केली जाते. या अधिनियमातील खंड (अ) मधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश, राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि शिक्षण क्षेत्रात पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती यापैकी एकाचे सदस्य म्हणून कुलपतींकडून नामनिर्देशन केले जाते. तसेच खंड (ब) नुसार नामनिर्देशित व्यक्ती हीच समितीची अध्यक्ष असते. यासोबतच इतर दोन सदस्य नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक आणि राज्याचे कृषि विभागाचे प्रधान सचिव किंवा सचिव हे असतात. यातील कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक हे एकच पद असल्याने आणि त्यांचे कार्यक्षेत्र पूर्ण देशभर असल्याने तातडीच्या परिस्थितीत कुलगुरु निवडीत त्यांच्या वेळेअभावी विलंब होतो. त्यामुळे महाराष्ट्र कृषि विद्यापीठे अधिनियम 1983 च्या कलम 17 (1) (अ) (दोन) मध्ये बदल करून निवड समितीत भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक यांचा किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे निवृत्त महासंचालक किंवा नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ भरती बोर्डाचे अध्यक्ष किंवा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक यांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget