महाराष्ट्र राज्यातून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक

मुंबई (२९ डिसेंबर २०१८) : भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद काल चैत्यभूमीवर सांयकाळी ८ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले असता त्यांच्या सोबत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संबधित प्रकरण आझाद यांनी थेट फेसबुक लाइव केले होते. यानंतर पोलिसांनी राज्यभरातून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली असून आज दुपारी कित्येकांना न्यायालयाच्या समोर ही हजर करण्यात आले असल्याची माहिती देताना आता पर्यंत पोलिसांनी भीम आर्मीच्या 300 ते 400 कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे, असे भीम आर्मीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या सभा मुंबई, महाराष्ट्रात होऊ नयेत म्हणूनच हे अटकसत्र सुरू असल्याचा आरोप आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

भीम आर्मीचे नेते आझाद यांची आज वरळीतील जांबोरी मैदानात सभा होणार आहे.या सभेसाठी ते काल मुंबई दाखल झाले. मालाड पूर्वे कडील मनाली गेस्ट हाऊस मध्ये ते थांबले आहेत. काल दुपारनंतर येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली. यानंतर पोलिसांनी थेट आझाद यानांच हॉटेलच्या बाहेर जाण्यास मज्जाव केला. तसेच त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांना ही पोलिसांनी हॉटेल मध्ये रोखून ठेवले.

सांयकाळी आझाद आपल्या कार्यकर्त्यांसोबत दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्या सोबत पोलिसांचा ही ताफा ही होता. आझाद चैत्यभूमीवर येणार असल्याने येथे ही पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. पण चैत्यभूमिवरुनच आझाद आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यानंतर पोलिसांनी राज्यभरातून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली.आज दुपारी कित्येकांना न्यायालयाच्या समोर ही हजर करण्यात आले असल्याची माहिती देताना आता पर्यंत पोलिसांनी भीम आर्मीच्या 300 ते 400 कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे, असे भीम आर्मीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मनाली हाॅटेल स्टेशन परिसर व आसपासच्या परिसरात पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला असून येथूनच भीम आर्मी मुंबई प्रमूख सुनीलभाऊ गायकवाड, मराठवाडा विभाग प्रमुख बलराजजी दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अॅड सचिन पट्टेबहादूर, अॅड अखिल शाक्य, सोलापूर प्रवीण बनसोडे बुलढाणा यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे, महासचिव सुनील थोरात, प्रीतेश चितळे, विवेक कांबळे, राजेश गवळी,दिनेश शर्मा,सिध्दार्थ भालेराव रतन उघडे विजय कांबळे, श्रीकांत धावारे, महादू पवार या प्रमुख पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांना ही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांना विक्रोळी न्यायालयात पाठविण्यात आले आहे. तर महाराष्ट्रचे महासचिव ,सुनील थोरात,मागाठाने तालुका अध्यक्ष,रतन उघडे, मागाठाने जिल्हा संघटक आनोदीन शेख या सर्वाना बोरिवली कोर्टात आणले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget