पुणे येथील भीम आर्मीच्या महासभेला परवानगी मिळविण्याकरीता दत्ता पोळ यांची उच्च न्यायालयात धाव


पुणे ( २९ डिसेंबर २०१८ ): मुंबईतील वरळी येथील भीम आर्मीच्या आज (२९ डिसेंबर २०१८) च्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पुण्यातील ३० डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या सभेला ही परवानगी नकारण्यात आलेली आहे. या विरोधात भीम आर्मीचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता पोळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

‘भीम आर्मी’तर्फे भीमा कोरेगाव येथील विजयाला २०१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात ‘भीमा कोरेगाव संघर्ष महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा ३० डिसेंबर रोजी या पुणे येथील आरटीओ कार्यालयाजवळील एसएसपीएमएस मैदानात आयोजित करण्यात आली असून सभेत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे संबोधित करणार आहे, असे भीम आर्मीचे पुण्यातील जिल्हाध्यक्ष दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती.

मात्र मुंबईतील वरळी येथील भीम आर्मीच्या २९ डिसेंबर २०१८ च्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पुण्यातील ३० डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या सभेला ही परवानगी नकारण्यात आलेली आहे. "पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी सभेला परवानगी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात दाद मागितली आहे", असे पोळ यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी राज्यभरातून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली असून आज दुपारी कित्येकांना न्यायालयाच्या समोर ही हजर करण्यात आले असल्याची माहिती देताना आता पर्यंत पोलिसांनी भीम आर्मीच्या 300 ते 400 कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे, असे भीम आर्मीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget