(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय ( 11 डिसेंबर 2018) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे मध्यम प्रकल्पास 1085 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय ( 11 डिसेंबर 2018) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे मध्यम प्रकल्पास 1085 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता


मुंबई (११ डिसेंबर २०१८) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे नरडवे (ता. कणकवली) येथील नरडवे मध्यम प्रकल्पास 2016-17 च्या दरसूचीवर आधारित 1084.66 कोटी खर्चाच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पांतर्गत गड नदीवर 123.74 दलघमी क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यातील 5119 हेक्टर, कुडाळ तालुक्यातील 909 हेक्टर आणि मालवण तालुक्यातील 1984 हेक्टर अशा एकूण 8084 हेक्टर क्षेत्रास या प्रकल्पाद्वारे सिंचनाचा लाभ होणार आहे.

नरडवे प्रकल्पाचा संकल्पित उपयुक्त पाणीसाठा 119.16 दलघमी असून एकूण पाणीवापर 92.025 दलघमी इतका आहे. या प्रकल्पास 1986-87 च्या दरसूचीवर आधारित 32.44 कोटी इतक्या रकमेस मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 1993-94 च्या दरसूचीवर आधारित 102.98 कोटी इतक्या रकमेस प्रथम सुप्रमा, 1997-98 च्या दरसूचीवर आधारित 189.91 कोटी इतक्या रकमेस द्वितीय सुप्रमा आणि 2005-06 च्या दरसूचीवर आधारित 446.71 कोटी इतक्या रकमेस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आजच्या निर्णयानुसार या प्रकल्पास 2016-17 च्या दरसूचीवर आधारित 1084.66 कोटी किंमतीस चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी 970.56 कोटी रुपयांची तरतूद अनुषंगिक खर्चासाठी करण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget