महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई (२७ डिसेंबर २०१८) : यंदाचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेखचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे अभिनंदन करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, रफिक यांचे वडील आदम शेख, भाऊ लखन शेख, प्रशिक्षक गणेश घुले यांच्यासह मान्यवर पैलवान उपस्थित होते. रफिक शेख हे मुळचे खडकी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील असून त्यांनी बुलढाण्याकडून खेळताना पहिल्यांदा विदर्भाला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रफिक यांना धन्यवाद दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget