(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी चैत्यभूमी येथे केले अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या
" />

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी चैत्यभूमी येथे केले अभिवादन


मुंबई (६ डिसेंबर २०१८): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, कालिदास कोळंबकर, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त जगदीश पाटील, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व संविधानानुसार आम्ही काम करीत आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व संविधानानेच भारत जगातील सर्वोत्तम देश बनू शकतो. मुख्यमंत्री यांच्या हस्ते डिसेंबर-2018 च्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
लोकराज्यचा विशेषांक
“क्रांतिसूर्याला विनम्र अभिवादन” या लोकराज्यच्या विशेषांकात डॉ. बाबासाहेबांचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महापरिनिर्वाण दिन कसावा पाळावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे कार्य, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा संविधान व शासनाच्या उपक्रमांसंदर्भातील “आपले संविधान, आपले सामर्थ्य” हा लेख तसेच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक लोकशाहीसंबंधी लेखाचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसुरी येथे प्रशिक्षणार्थी नागरी सेवा अधिकाऱ्यांना उद्देशून केलेले भाषण, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधलेल्या नागरिकांच्या यशकथांचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. या विशेषांकाचे अतिथी संपादक ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत.

या अंकाची किंमत 10 रुपये असून तो सर्वत्र उपलब्ध आहे. तसेच कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला यावेळी भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विधानभवनात आदरांजली

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज गुरुवार, दि. 6 डिसेंबर रोजी विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. या प्रसंगी विधानमंडळाचे उप सचिव विलास आठवले, मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, नागनाथ थिटे, ऋतुराज कुडतरकर, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील, अवर सचिव रवींद्र जगदाळे, अवर सचिव (समिती) सुनील झोरे, आनंद रहाटे आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget