(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, तबला वादक विनायक थोरात यांना पुरस्कार प्रदान | मराठी १ नंबर बातम्या
" />

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, तबला वादक विनायक थोरात यांना पुरस्कार प्रदान

मुंबई (१३ डिसेंबर २०१८) : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि तबला वादक विनायक थोरात यांनी निस्वार्थपणे केलेली रंगभूमीच्या सेवेचे काही मोल असू शकत नाही. या दोन्ही कलाकारांनी रंगभूमीसाठी दिलेले योगदान हे अमूल्य आहे. त्यांनी नवीन पिढी घडावी यासाठी केलेले प्रयत्न हे आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत, असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काढले.

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आज मुंबई मराठी साहित्य संघ येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्यासह गेल्या वर्षीचे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ रंगकर्मी बाबा पार्सेकर, निर्मला गोगटे, अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे आदी उपस्थित होते. तावडे यावेळी म्हणाले, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर मोठा पडदा, रंगभूमी, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. आजही तितक्याच उत्साहाने काम करणाऱ्या जयंत सावरकर यांनी असेच यापुढेही काम करीत रहावे. ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांच्याविषयी बोलताना तावडे म्हणाले की, संगीत क्षेत्रात नवीन पिढी घडावी यासाठी थोरात करीत असलेले प्रयत्न महत्वपूर्ण आहेत.

जयंत सावरकर यांना यावर्षीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि विनायक थोरात यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रु. ५ लाख असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही पुरस्कारार्थींच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा कलंदर हा कार्यक्रम कलावंतानी यावेळी सादर
केला. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन कौस्तुभ सावरकर यांची केले होते, तर नाट्यगीतांना साथसंगत संजय गोगटे आणि विनायक थोरात यांनी केली होती. रवी पटवर्धन, प्रमोद पवार, वसंत इंगळे, अतुल परचुरे, संपदा माने, अविनाश खर्शीकर आणि जयंत सावरकर हे कलाकार नाट्यप्रवेश सादर केला. तर श्रीरंग भावे, मयूर सुकाळे, कल्याणी जोशी, अमेय ठाकूरदेसाई, झंकार कानडे, सूर्यकांत सुर्वे, विघ्नेश जोशी आणि कीर्ती शिलेदार अशा कलाकरांनी नाट्यसंगीत सादर केले. यावेळी संन्यस्त खडग हे प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केलेले नाटक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कलाकारांनी सादर केले तर हाच मुलाचा बाप हे ज्ञानेश पेंढारकर दिग्दर्शित नाटक ललित कलादर्शच्या कलाकारांनी सादर केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget