मुंबई (२० डिसेंबर २०१८) : मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेसाठी (सारथी) व्यवस्थापकीय संचालक हे पद निर्माण करण्यासह या पदावरील अधिकाऱ्याची नियुक्ती सरळसेवा, प्रतिनियुक्ती किंवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कंपनी अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कराव्या लागणाऱ्या कामाचा व्याप मोठा असून त्यासाठी विविध विभागांमार्फत वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आणि योजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे सारथी संस्थेच्या त्वरित कार्यान्वयनासाठी सारथी मार्गदर्शन समितीने सूचविलेल्या कायमस्वरुपी पदांना मंजुरी देणे आवश्यक होते. सारथीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात 61 आणि प्रादेशिक स्तरावर 48 अशा एकूण 109 इतक्या मनुष्यबळाची गरज आहे. त्यातील
व्यवस्थापकीय संचालक, लेखापाल व निबंधक ही पदे तातडीने उपलब्ध करून देताना उच्चस्तर सचिव समितीने व्यवस्थापकीय संचालक या पदास मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याबाबत अभिप्राय दिले होते. त्यानुसार व्यवस्थापकीय संचालक (रु.15600-39100, ग्रेड पे रु.7600) हे पद निर्माण करण्यास आज मान्यता
देण्यात आली. हे पद सरळसेवा, प्रतिनियुक्ती अथवा सेवानिवृत्तीच्या वेळी कमीतकमी 7600 इतकी वेतनश्रेणी असणारा सेवानिवृत्त अधिकारी यामधून भरण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा