थ्रीडी तंत्रज्ञानामुळे भविष्यात क्रांतीकारक बदल - उद्योगमंत्री सुभाष देसाई


मुंबई (८ डिसेंबर २०१८) : त्रिमितीय प्रिंटींग तंत्रज्ञानामुळे ( थ्रीडी प्रिटींग) आरोग्य, ऑटो, एरो स्पेस, ज्वेलरी तसेच बांधकाम क्षेत्रात मोठे क्रांतीकारक बदल घडून येणार आहेत. राज्य शासन या बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी धोरण तयार करेल असे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मुंबई येथे आयोजित थ्रीडी प्रिंटींग वर्ल्ड परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना देसाई म्हणाले की, थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानामुळे अनेक किचकट बाबी सोप्या पद्धतीने मांडता येणार आहेत. आरोग्य क्षेत्रात दंतरोग तज्ज्ञांना या तंत्रज्ञानाची मोठी मदत होणार आहे. मानवी चुका कमी करण्यासाठी थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानाचा विशेष फायदा होणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग राज्य शासन सकारात्मक कामांसाठी करणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने ई-व्हेइकल धोरण स्वीकारले आहे. थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानाची ज्या क्षेत्रासाठी गरज आहे, त्यानुसार त्याचा अवलंब केला जाईल. आतापर्यंत अशक्य वाटणाऱ्या बाबी थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहेत असेही देसाई यांनी यावेळी सांगितले. येत्या पाच वर्षांत थ्रीडी प्रिटींग तंत्रज्ञानातही क्रांतीकारक बदल होणार असल्याचे यावेळी झालेल्या सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले. यावेळी शासकीय दंत महाविद्यालयाचे डॉ. मानसिंग पवार, त्रिनिटी मीडियाचे सीईओ शिबू जॉन व इतर मान्यवर उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget