(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला | मराठी १ नंबर बातम्या
" />

मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला

मुंबई (१० डिसेंबर २०१८) : मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हल्ला करण्यात आला आहे.

दरम्यान, तिथे उपस्थित इतर वकिलांनी त्या व्यक्तीला अडवत त्याला चांगलाच चोप दिला. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु होती. यानंतर न्यायालयात काय घडले यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला.

मारहाण करणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव वैजनाथ पाटील असून जालना जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. वैद्यनाथ पाटील नेमका कोण आहे, याबद्दल माहिती अद्याप मिळालेली नाही.

गुणरत्न सदावर्ते यांनी याआधीही आपल्याला धमक्या मिळत असल्याचे सांगितले होते.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget