(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र संविधानाची प्रास्ताविका लावण्यासाठी जागा निश्चित | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र संविधानाची प्रास्ताविका लावण्यासाठी जागा निश्चित

मुंबई (१२ डिसेंबर २०१८) : मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रास्ताविका लावण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत
मंत्रालयात बैठक घेण्यात आली. आमदार प्रकाश गजभिये यांच्या विनंतीवरुन ही बैठक लावण्यात आली होती. त्यानंतर राज्यमंत्री मदन येरावार, आमदार प्रकाश गजभिये यांच्यासह संबंधीत अधिकाऱ्यांकडून मंत्रालयात जागेची पाहणी करुन जागा निश्चित करण्यात आली. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश यावेळी राज्यमंत्री येरावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. ए. सगणे, सहसचिव छाया वडते, मुख्य वास्तु रचनाकार देशपांडे, अभियंता रेश्मा चव्हाण, आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रविण भोटकर आदी उपस्थित होते. विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी मंत्रालयात बाबासाहेबांचे तैलचित्र आणि संविधानाची प्रास्ताविका लावण्यासासाठी लवकरात लवकर जागा निश्चित केली जाईल, असे विधानपरिषदेत सांगितले होते. त्यानुसार आज मंत्रालयात बैठक घेऊन आणि त्यानंतर जागेची पाहणी करुन जागा निश्चित करण्यात आली. तसेच यासाठी त्वरित प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश राज्यमंत्री येरावार यांनी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget