(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); संविधान मार्चमुळे तरूण पिढीमध्ये जनजागृती-शरद पवार | मराठी १ नंबर बातम्या
" />

संविधान मार्चमुळे तरूण पिढीमध्ये जनजागृती-शरद पवार

मुंबई (१० डिसेंबर २०१८) : भारतीय संविधानाला जातीयवादी शक्तीकडून असणारा संभाव्य धोका लक्षात घेता संविधानाच्या सन्मानार्थ निघणा-या मार्चमुळे आजच्या तरूण पिढीमध्ये संविधानाविषयी सकारात्मक जनजागृती होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाने 26 नोव्हेंबर या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर असा भीमा कोरेगाव ते चैत्यभूमी संविधान सन्मान लाॅगमार्च काढला होता. या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली सलग 11 दिवस चाललेल्या या संविधान लाॅग मार्चचे तरूणांनी ठिक ठिकाणी स्वागत करून आपला सहभाग नोंदवला. या मार्च दरम्यान जयदीपभाई कवाडे यांनी संविधानाविषयी तरूणांमध्ये जनजागृती करीत असतानाच संविधान बदलण्याचे कारस्थान बदलवू पाहणा-यांना रोखण्याची ताकद तरूण पिढीमध्येच असल्याची जाणीव तरूण पिढीला करून दिली.

6 डिसेंबर रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे या मार्चची सांगता झाल्यानंतर कवाडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेत पवार यांनी कवाडे यांचे कौतुक करताना तरूण पिढीला संविधान साक्षर आणि संविधान काय आहे, याची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तरूण पिढी या देशाचा कणा आहे. परिवर्तन करण्याची ताकद या तरूणाईमध्ये आहे. भीमा कोरेगाव ते चैत्यभूमी अशा निघालेल्या संविधान मार्चमुळे या पिढीमध्ये आलेले चैतन्य परिवर्तन घडविण्यास सहाय्यभूत ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केल्याचे जयदीपभाई कवाडे यांनी सांगितले.

दरम्यान संविधान जागृतीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आपण लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सह सर्व समविचारी पक्ष संघटनांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहितीही कवाडे यांनी दिली. संविधान विरूध्द संविधानविरोधी शक्ती असा लढा उभारून देशाला सशक्त भारत ही ओळख करून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget