मुंबई (१७ डिसेंबर २०१८) : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते चित्रकार नरेंदर रेड्डी यांनी रेखाटलेल्या गणपती आणि श्री कृष्णाच्या विविध रूपांवर आधारित "द इर्टनल मेस्मराइझर" या चित्रकलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी चित्रकार नरेंदर रेड्डी यांना या चित्रप्रदर्शनासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीतील हॉल क्रमांक 4 येथे 17 ते 23 डिसेंबर या कालावधीत हे चित्रप्रदर्शन सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा