(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे महापौरांच्या हस्ते आज उद्घाटन | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे महापौरांच्या हस्ते आज उद्घाटन

मुंबई (१८ डिसेंबर २०१८) : मुंबई उपनगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी आयोजित केलेल्या मुंबई उपनगर ग्रंथोत्सव 2018 चे उदघाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते उद्या बुधवार दि. 19 डिसेंबर रोजी नॅशनल लायब्ररी येथे होणार आहे. यावेळी आमदार आशिष शेलार, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १९ ते २० डिसेंबर २०१८ रोजी ग्रंथोत्सव साजरा होणार असून या ग्रंथजत्रेमध्ये विविध मान्यवर भाग घेणार आहेत. या ग्रंथोत्सवात विविध मान्यवरांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत विविध कार्यक्रम या काळात होणार आहे. समाजात वाचन संस्कृती रुजावी, यात नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथोत्सव 2018’ चे आयोजन करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget