(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राजभवनच्या नव्या दरबार हॉलची पायाभरणी | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राजभवनच्या नव्या दरबार हॉलची पायाभरणी

मुंबई (१९ डिसेंबर२०१८) : राजभवन येथे नव्या दरबार हॉलचे भूमिपूजन तसेच पायाभरणी समारंभ राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी दि.२० डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता होणार आहे. राज्यपाल-सचिवालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा देखील यावेळी शुभारंभ होणार आहे.

वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

नव्या दरबार हॉलची क्षमता एकंदर ९०० आसनांची असेल. जुन्या दरबार हॉलची क्षमता २५० इतकी होती. नवा दरबार हॉल तसेच राज्यपाल सचिवालय इमारत ३१ जानेवारी २०२० पर्यंत बांधून पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget