मुंबई (२४ डिसेंबर २०१८) : शिर्डी येथील साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० कोटी रूपयांचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार राज पुरोहित, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, चंद्रशेखर कदम, भाऊसाहेब वाघचौरे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा