मुंबई, दि. 27 : मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेल्या घटनांची नि:पक्षपातीपणे फेरचौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आज केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी केसरकर बोलत होते. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अनिल शिंदे, दशरथ पाटील, सुभाष कदम, विजय भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील विशिष्ट गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच शासन निर्णयाप्रमाणे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. परंतु काही ठिकाणच्या घटनांमध्ये आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले असल्यास किंवा आंदोलनात सहभागी नसतानाही गुन्ह्यांची नोंद झालेल्या घटनांची माहिती समन्वय समितीने पंधरा दिवसात पोलीसांना द्यावी. अशा घटनांची फेरचौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा