मुंबई (२० डिसेंबर २०१८) : शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2018-19 या वर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) परीक्षेमध्ये शासन आदेशान्वये सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची कार्यवाही होणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेकडे 10 जानेवारी 2019 पर्यंत तसेच शाळांनी विभागीय मंडळाकडे 21 जानेवारी 2019 पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. तरी संबंधित पालक, विद्यार्थी व सर्व मान्यताप्राप्त शाळांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे. मंडळ निकषानुसार कोणताही प्राप्त विद्यार्थी वरील सवलतींपासून वंचित राहणार नाही, याची शाळाप्रमुखांनी नोंद घ्यावी.
टिप्पणी पोस्ट करा