(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); येत्या 20 जानेवारी 2019 रोजी होणार मुंबई मॅरेथॉन | मराठी १ नंबर बातम्या
" />

येत्या 20 जानेवारी 2019 रोजी होणार मुंबई मॅरेथॉन

मुंबई (२४ डिसेंबर २०१८) : मुंबई मॅरेथॉन-2019 आयोजित करत असताना या मॅरेथॉनमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर ताण येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी याबाबत सर्व खबरदारी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा-मुंबई मॅरेथॉन आयोजनासंदर्भातील बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात अली होती. या बैठकीला क्रीडा मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई पोलीस सहआयुक्त देवेन भारती, टाटा मुंबई मॅरॅथॉनचे विवेक सिंग, अनिल सिंग, निवृत्त सनदी अधिकारी अरविंद रेड्डी, बाळासाहेब कोळसे,आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई मॅरेथॉन हे मुंबईसाठी गौरव आहे. सध्या मुंबईमध्ये मेट्रोचे काम सुरु असल्याने मुंबई मॅरेथॉनसाठी तयारी करताना पुढील चार-पाच वर्षाचे नियोजन करून तयारी करावी. मुंबई मॅरेथॉन 2019 बाबत यावेळेस सादरीकरण करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget