(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत महापालिकेला ३ स्‍टार ध्‍येय गाठण्‍यासाठी स्‍वच्‍छतेबाबत नागरिकांचे आक्षेप अथवा सूचना असल्‍यास १५ दिवसांत कळविण्‍याचे महापालिकेचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या
" />

‘स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत महापालिकेला ३ स्‍टार ध्‍येय गाठण्‍यासाठी स्‍वच्‍छतेबाबत नागरिकांचे आक्षेप अथवा सूचना असल्‍यास १५ दिवसांत कळविण्‍याचे महापालिकेचे आवाहन

मुंबई (१७ डिसेंबर २०१८) : ‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ अंतर्गत असलेली उद्दिष्‍टे ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत साध्‍य करण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका अथक प्रयत्‍न करीत आहे. स्‍वच्‍छतेची अधिक चांगली पातळी गाठण्‍यासाठी केंद्र सरकारच्‍या ‘गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार’ मंत्रालयातर्फे ‘Garbage Free Star rating’ चे निकष ठरविण्‍यात आले आहेत. शहरांना प्रगतीशील सुधारणांसह स्‍वच्‍छतेच्‍या ५ आणि ७ स्‍टारचे ध्‍येय गाठता येतील, अशाप्रकारे निकष
बनवले गेले आहेत. त्‍यासंबंधीची माहिती तपशिलासह ‘स्‍वच्‍छ भारत अर्बन’ या केंद्र शासनाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने गतवर्षी स्‍वच्‍छतेसाठी पायाभूत सुविधा, माहिती-शिक्षण-संवाद अंतर्गत कार्यक्रम, क्षमता बांधणी अशा सर्व स्‍तरावर काम केले असल्‍याने घरोघरी कचरा संकलन, कचरा वर्गीकरण, मोठय़ा
प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱया संस्‍थांतर्फे कचऱयाची जागेवर विल्‍हेवाट, प्‍लास्टिकबंदी, कचऱयावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने विल्‍हेवाट इत्‍यादी दर्शनीय बदल दिसून आले आहेत. बृहन्‍मुंबई महानगरपालिका ‘स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत असणाऱया ‘Garbage Free Star rating’ मध्‍ये दिलेल्‍या निकषाच्‍या अधीन राहून ३ स्‍टारसाठी अर्ज करत आहे. नागरिकांना विनंती की, याबाबत काही आक्षेप अथवा सूचना असल्‍यास
त्‍यांनी greenmumbai.report@gmail.com या मेलवर १५ दिवसांच्‍या आत कळविण्‍यात याव्‍यात, असे महापालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्‍यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget