(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भारतीय प्रेस परिषदेच्या बैठकीला मुंबईत प्रारंभ | मराठी १ नंबर बातम्या
" />

भारतीय प्रेस परिषदेच्या बैठकीला मुंबईत प्रारंभ

मुंबई (१७ डिसेंबर २०१८) : भारतीय प्रेस परिषदेचे (Press Council of India) अध्यक्ष न्यायमुर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद यांच्यासह परिषदेच्या सदस्यांचे आज सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी स्वागत केले.

भारतीय प्रेस परिषदेच्या चौकशी समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. आज (दि. १७) व उद्या (दि. १८) होणाऱ्या या बैठकीत पश्चिम राज्यांमधील प्रेस व पत्रकारिता मानकांच्या उल्लंघनासंदर्भातील ३२ प्रकरणांची सुनावणी होणार आहे. यासाठी परिषदेचे अध्यक्ष न्यायमुर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद, परिषदेचे सदस्य प्रवतकुमार दाश, डॉ. बलदेव राज गुप्ता, अशोक उपाध्याय, उत्तम चंद्र शर्मा, केशव दत्त चंडोला, एम. ए. माजिद, सय्यद रजा हुसैन रिजवी, परिषदेच्या सचिव अनुपमा भटनागर हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या मान्यवरांचे पुष्पगुच्छ तसेच मॅग्नेटीक महाराष्ट्र आणि लोकराज्य विशेषांकाची प्रत देऊन स्वागत केले. यावेळी परिषदेचे उपसचिव एस. के. मग्गों, अवर सचिव टी. गाऊ खंगीन यांच्यासह सुनावणीस आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.

आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी प्रक्रियेस सुरुवात झाली. दोन दिवस चालणारी ही सुनावणी प्रक्रिया प्रेस आणि सर्वसामान्य जनता यांच्यासाठी खुली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget