(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुद्रा योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी - जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुद्रा योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी - जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे

मुंबई, दि. 21 : मुद्रा योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी मुद्रा योजना प्रचार, प्रसार समितीच्या सर्व सदस्यांसह संबंधितांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा मुद्रा योजना प्रचार-प्रसार समिती अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अशासकीय सदस्य सर्वश्री राजेश मिश्रा, सुजीत कांबळे, डॉ. संदिप पाटील, हर्ष राजपूत, उद्योग विभागातर्फे मिलिंद मोहोड तसेच समितीचे सदस्य सचिव जिल्हा नियोजन अधिकारी एस. के. बोरकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुद्रा योजना ही अतिशय महत्वपूर्ण योजना असून ती योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांची प्रगती होऊ शकते, असे जोंधळे मार्गदर्शन करताना म्हणाले. प्रसिद्धीच्या विविध माध्यमांचा योग्य उपयोग करुन त्याद्वारे या योजनेची अधिकाधिक प्रसिद्धी करावी, असेही त्यांनी सांगितले. अशासकीय सदस्यांनी प्रसिद्धीसंदर्भात करावयाच्या विविध योजनांबद्दल सविस्तर चर्चा केली. तसेच मेळाव्यांद्वारे अधिकाधिक लाभार्थी मिळवून देण्याबाबत त्यांनी आश्वासित केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget