मुंबई (२० डिसेंबर २०१८) : अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील 20 पाझर तलाव व 3 लघु पाटबंधारे तलावांमध्ये विविध स्त्रोतांच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येणार आहे. या तलावांतील पाण्याचा वापर पिण्यासह सिंचनासाठी करण्यासाठी 61 कोटी 3 लाख 24 हजार 265 रुपये किंमतीच्या तुकाई उपसा सिंचन योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
तुकाई उपसा सिंचन योजनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील बऱ्याच भागातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यासह सिंचन क्षमताही पुन:स्थापित होऊ शकते. ही शक्यता विचारात घेऊन या योजनेस व्यय अग्रक्रम समितीची मान्यता न घेता विशेष बाब म्हणून विविध अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जलसंधारण विभागाच्या 30 मे 2018 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार स्थापन केलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून (SLTAC) या योजनेस निविदा काढण्यापूर्वी मान्यता दिली जाईल. तसेच 23
नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार आर्थिक परताव्याचा दराबाबत (IRR) दक्षता घेतली जाईल. उपसा सिंचन योजनेचे स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी घटकांची सविस्तर संकल्पने व आराखड्यांना सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेतली जाईल. या योजनेसाठीची 115 दलघफू (MCFT) पाणी उपलब्धता कुकडी डाव्या
कालव्याच्या मुखाजवळ (At Canal Head) आहे. या कालव्याचा 173 किमीपर्यंतचा वहन व्यय (Conveyance Losses) विचारात घेऊन त्यानुसार परिगणित निव्वळ पाणी उपलब्धता विचारात घेण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा