दिवंगत अरूण बोगिंरवार श्रद्धांजली सभा

मुंबई (२१ डिसेंबर २०१८) : अरूण बोंगिरवार यांचे कार्य नव्या उमेदीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी दिपस्तंभासारखे राहील. दिवंगत बोंगिरवार यांनी आपल्या कामात नेहमी सकारात्मकता आणि लोकाभिमुखता जपली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे राज्याचे माजी मुख्य सचिव अरूण बोंगिरवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री फडणवीस दिवंगत अरूण बोंगिरवार यांच्या श्रद्धांजली सभेत बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात झालेल्या या श्रध्दांजली सभेस बोंगिरवार कुटूंबीयासह राजकीय, प्रशासकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बोंगिरवार यांनी जिल्हाधिकारी ते मुख्य सचिव या पदापर्यंत काम केले. या प्रत्येक टप्प्यांवर त्यांनी आपल्या सकारात्मक आणि लोकाभिमुख कामाचा ठसा उमटविला. निवडून आलेले
प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवांच्या जोरावरच शासनाच्या कामाचा रथ पुढे जातो, हे त्यांनी आपल्या हातोटीतून सिद्ध केले. त्यामुळेच आजही त्यांचे काम अनेकांसाठी प्रशासनिक दृष्ट्या मार्गदर्शक ठरते. झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्पही त्यांनी यशस्वी करून दाखविला. यासाठी त्यांनी अनेक घटकांना विश्वासात घेतले होते. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक प्रकल्प ठरल्याचेही,
मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. दिवंगत बोंगिरवार यांच्याकडील सकारात्मकता आणि लोकाभिमुखता आजही
प्रशासनातील नव्या उमेदीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यादृष्टीने दिवंगत बोगिंरवार यांचे कार्य प्रशासकीय क्षेत्रासाठी दिपस्तंभासारखे राहील, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

खासदार अशोक चव्हाण, खासदार नारायण राणे, माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

बोंगिरवार कुटूंबीयांच्या विश्र्वस्त संस्थेकडून दिवंगत बोंगिरवार यांच्या जयंती दिनी प्रशासकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी "अरूण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड" हा पुरस्कार देण्यात येईल
असे प्रविण परदेशी यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget