(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नाताळ निमित्त राज्यपालांचे ‘मेरी क्रिसमस’ | मराठी १ नंबर बातम्या
" />

नाताळ निमित्त राज्यपालांचे ‘मेरी क्रिसमस’

मुंबई (२४ डिसेंबर २०१८) : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नाताळ निमित्त ‘मेरी क्रिसमस’ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या कल्याणकारी जीवनाचे विशेषतः त्यांच्या करुणा व क्षमाशीलतेच्या संदेशाचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांनी शाश्वत सत्य व नितीमुल्यांचा पुरस्कार करताना सहन केलेल्या यातनांचे देखील यावेळी स्मरण होते. नाताळचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व संपन्नता घेवून येवो. मी राज्यातील सर्व लोकांना नाताळनिमित्त ‘मेरी क्रिसमस’ व नववर्षाच्या शुभेच्छा देतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget