मंत्रिमंडळ निर्णय (२० डिसेंबर २०१८) : वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय राहता येथे स्थापन करण्यास मान्यता

मुंबई (२० डिसेंबर २०१८) : राहता (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे राहता तालुक्यातील नागरिकांची व पक्षकारांची सोय होणार असून न्यायदानाची प्रक्रिया अधिक लोकाभिमुख व गतिमान होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यासाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने शासनास विनंती केली होती. त्यानुसार राहता तालुक्यासाठी राहता येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापनेसह या न्यायालयासाठी आवश्यक 20 पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget