(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); “वतन को जानो” - काश्मिरी युवा आदान प्रदान - कार्यक्रमाचे थाटात उदघाटन संपन्न | मराठी १ नंबर बातम्या
" />

“वतन को जानो” - काश्मिरी युवा आदान प्रदान - कार्यक्रमाचे थाटात उदघाटन संपन्न

मुंबई ( २६ डिसेंबर २०१८ ): नेहरू युवा केंद्र, मुंबई, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार द्वारा मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने दिनांक २४ ते २९ डिसेंबर, २०१८ दरम्यान “काश्मिरी युवा आदान प्रदान” कार्यक्रमाचे आयोजन न्यूझीलंड होस्टेल, आरे कॉलोनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन अतुल भातखळकर, आमदार, बोरीवली, मुंबई यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना भातखळकर म्हणाले की, काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत आपला भारत देश एक आहे. आपले वतन – भारत देशाला जाणून घेण्यासाठी एकमेकांमध्ये जावून मिसळण्याची आवश्यकता आहे, जे आपण आज करीत आहात हे कार्य स्तुत्य आहे. पुढे बोलतांना भातखळकर म्हणाले की, आमची संस्कृती भिन्न भिन्न असली तरी आम्ही सर्व एक आहोत. सर्व गोष्टींमध्ये माणुसकी सर्वात श्रेष्ठ आहे. भारताच्या एकात्मतेचा आधार आमचे संविधान आहे. संविधानाने पूर्ण देश एका सूत्रामध्ये बांधला आहे. काश्मिर मधील युवांनी या कार्यक्रमादरम्यान मुंबई व महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती करून घ्यावी.

राजीव अग्रवाल, माजी भा.प्र.से., महासचिव, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ़ लोकल सेल्फ गवर्नमेंट, मुंबई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली होते. मोनिका सिंह, प्रसिद्ध उर्दू गज़लकार तथा उपजिल्हाधिकारी, पुणे, अनिल मुरारका, ट्रस्टी, मिठीबाई महाविद्यालय, मुंबई, फिरोज मासुलदार, संस्थापक, अध्यक्ष, मुस्लिम सेवा संघ, उस्मान खान, महासचिव, मुस्लिम सेवा संघ, मुंबई, राम पाल, रसिका अणेराव, सदस्य जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समिती, मुंबई उपनगर, रियाझ अहमद, इंडियन स्पोर्ट्स अकादमी, मुंबई, अभिजित राणे, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मोनिका सिंह, प्रसिद्ध उर्दू गज़लकार तथा उपजिल्हाधिकारी, पुणे यांनी युवांना मार्गदर्शक करतांना म्हणाल्या की, मराठी व उर्दू भाषा ह्या प्रादेशिक भाषा बहिणी आहेत. विविधतेत एकता राखण्यासाठी प्रादेशिक भाषा महत्वाची भूमिका पार पाडतात. या प्रसंगी त्यांनी तीरंग्यावरील उर्दू गझल सादर केली. अनिल मुरारका यांनी त्यांच्या संस्थेद्वारा जम्म्मू व काश्मिर राज्यात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती युवांना सांगितली. फिरोज मासुलदार यांनी जम्मू व काश्मिर येथील युवांना मुंबई येथील शैक्षणिक प्रगती बद्दल माहिती दिली. उस्मान खान, महासचिव, मुस्लिम सेवा संघ यांनी युवांना राष्ट्रीय एकात्मता व शांतीच्या संदेशाचे अग्रदूत म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. रियाझ अहमद, इंडियन स्पोर्ट्स अकादमी, मुंबई यांनी देशाच्या क्रीडा क्षेत्राची थोडक्यात माहिती देवून जम्म्मू व काश्मिर राज्यातून क्रीडा क्षेत्रामध्ये मुलींची संख्या वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात राजीव अग्रवाल, माजी भा.प्र.से., महासचिव, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ़ लोकल सेल्फ गवर्नमेंट, मुंबई यांनी देशाच्या विकासात कौशल्य प्राप्त युवांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे विषद करून ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ़ लोकल सेल्फ गवर्नमेंट द्वारा देशात आणि विशेषतः जम्म्मू आणि काश्मिर राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती युवांनी दिली विद्यापीठांमधून शिक्षण घेण्यास अडचणी येणाऱ्या युवांना शिक्षणाची अन्य द्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले. अश्याप्रकारच्या कार्यक्रमामधून राष्ट्रीय एकात्मता आणखी घट्ट होईल असे ते म्हणाले.

आपल्या स्वागतपर भाषणात यशवंत मानखेडकर, जिल्हा युवा समन्वयक, मुंबई यांनी या कार्यक्रम आयोजनामागील शासनाची भूमिका स्पष्ट केली. अश्या प्रकारचे कार्यक्रम देशभरातील निवडक मुख्य शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, त्यामध्ये मुंबईचा सुद्धा समावेश आहे. काश्मिर खोऱ्यातील युवांना देशाच्या विविध भागातील, विविध क्षेत्रातील प्रगती जाणून घेता यावी, देशातील सांस्कृतिकक, औद्योगिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि शैक्षणिक रुची असलेल्या विविध ठिकाणी भेट देण्यासाठी सहभागींना संधी प्रदान करणे, अनुकूल सहभागी ज्ञान विकसित करण्यासाठी मदत करणे, देशाच्या विविध राज्यामध्ये पर्यटन, अन्न, सांस्कृतिक, हस्तकला आणि काश्मिर खोऱ्याच्या इतर उत्पादनावरील माहिती सामाहिक करणे, सामजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्यास, प्रशंसा करण्यास आणि तुलना करण्यास संधी प्रदान करणे, भारतीय संविधानावरील माहिती आणि ज्ञान प्राप्त करणे, नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी, राष्ट्रीय एकत्रीकरण, देशभक्ती आणि राष्ट्र विकास यावर संवाद व चर्चा करणे, युवांनी असामाजिक तत्व व गुन्हेगारीकडे न वळता समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या भावना वृद्धिंगत व्हाव्यात, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिर खोऱ्यात तरुणांची भूमिका आणि जबाबदारी मोठी आहे. ते देशाचा अभिमान आहेत आणि त्यांच्याकडे नवीन कल्पना आणि मते आहेत. त्यांच्याकडे राज्य कार्यप्रणालीमध्ये सकारात्मक बदल आणण्याची क्षमता आहे. सध्याच्या परिस्थितीत काश्मिर खोऱ्यात अनेक समस्या येत आहेत. युवासाठी रोजगारासह अनेक उपक्रम राबविणे हे आवश्यक आहे.

मुंबई येथील कार्यक्रमात प्रामुख्याने जम्मू आणि काश्मिर राज्यातील अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगम, श्रीनगर, व पुलवामा या जिल्हयातील १३२ युवक – युवती सहभागी झाले आहेत. २४ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान विविध शैक्षणिक, विकासात्मक विषयांवर मान्यवरांची सत्रे, मुंबई शहरातील विविध शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी, सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम, प्रदर्शनी, फूड फेस्टिवल इ. भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही श्री. यशवंत मानखेडकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन मदन घेघाटे व लकी तरार यांनी केले. आभार अनुजा हंगारगे, कार्यक्रम समन्वयक, पुणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्र, मुंबई उपनगरचे सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. उदघाटन कार्यक्रमाला जम्म्मू आणि काश्मिर व महाराष्ट्रातील युवक – युवती उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget