(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018 जाहीर ; टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया, आऊट डोअर यांचाही समावेश | मराठी १ नंबर बातम्या
" />

शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018 जाहीर ; टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया, आऊट डोअर यांचाही समावेश

मुंबई (२० डिसेंबर २०१८) : वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, नभोवाणी, समाजमाध्यम, बाह्य माध्यमे यांचा समावेश असलेली नवी शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018 आज शासनाने निर्गमित केली.

शासकीय संदेशाचे प्रसारण तसेच शासकीय योजनांबाबत जनजागृती करणे यासाठी वृत्तपत्रासह अन्य माध्यमांचा अधिक प्रभावी आणि कौशल्यपूर्ण उपयोग करण्याच्या दृष्टीने ही नियमावली तयार करण्यात आली असून विविध समाजघटकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी केवळ वृत्तपत्रेच नव्हे तर दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडिओ, बाह्य माध्यमे, समाजमाध्यमे (सोशल मीडिया) या विविध प्रसार माध्यमाद्वारे शासकीय संदेशाचे प्रसारण करणे हा हेतू असून संदेशाच्या प्रसारणाचे नेमके उद्दिष्ट कोणत्या घटकांसाठी आहे हे लक्षात घेऊन माध्यमाची निवड करणे ही या नियमावलीतील महत्वाची तरतूद आहे. जास्तीत जास्त समाजघटकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रसारमाध्यमामार्फत शासकीय माहितीचे प्रभावी आणि कौशल्यपूर्ण प्रसारण या नियमावलीनुसार होणार आहे. शासकीय संदेश प्रसारण नियमावली 2018 नुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. मुद्रित माध्यम - दैनिके, अर्धसाप्ताहिके/द्विसाप्ताहिके, साप्ताहिके. श्राव्य व दृकश्राव्य माध्यमे – रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी उद्घोषणा. बाह्य व अन्य प्रसिद्धी माध्यमे – जाहिरात फलक व बिलबोर्ड, पोल किऑस्क, डिजिटल बोर्ड, सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स बॅनर, बस पॅनल किंवा शेल्टर, इल्युमिनिटेड सायनेज, वॉल पेटींग, डिस्प्ले पॅनल. वेब आणि समाज माध्यमे – सोशल नेटवर्किंग, मायक्रोब्लॉगिंग, ब्लॉगिंग, फोटो शेअरिंग, ऑडिओ-व्हिडिओ शेअरिंग, इन्स्टंट मेसेजिंग. वृत्तपत्रांकरिता असलेला जाहिरात दर ठरविण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता होणार असून 2001 नंतर प्रथमच साधारणत: दुप्पट ते तिप्पट दरवाढ वृत्तपत्रांना मिळणार आहे. छोट्या वृत्तपत्रांबरोबरच मोठ्या वृत्तपत्रांनाही त्यांचा खप आणि स्थानिक पातळीवरील त्यांचे महत्व लक्षात घेऊन उचित न्याय देण्याचा प्रयत्न या नियमावलीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर वृत्तपत्राच्या जाहिरात क्षेत्रात नव्याने उदयास आलेल्या जा‍हिरात प्रकारांचाही (जॅकेट, फ्रेंच विंडो, हाफ फ्लॅप) समावेश या नियमावलीत करण्यात आला आहे.

याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक 201812201818380207 असा आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget