इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स पुरस्काराने महाराष्ट्र सन्मानित

मुंबई (७ डिसेंबर २०१८) : मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स (उत्पादन क्षमतेचे मानांकन) आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉप्मिटिटिव्ह रेट (उत्पादन क्षमतेमधील क्रमांक) या घटकांमध्ये महाराष्ट्राने ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवॉर्ड’ प्राप्त केला आहे. देशातील २९ राज्यांचे या अनुषंगाने फ्रॉस्ट ॲण्ड सॅलिव्हन कंपनीने सर्वेक्षण केले. जागतिक पातळीवर ही कंपनी ‘मार्केट संशोधन, सर्वेक्षणासाठी’ प्रसिद्ध आहे. राज्याने विकासात (ग्रोथ) उत्तम, नाविन्यतेत (इनोव्हेशन) उत्कृष्ट, नेतृत्वाशी संबंधित मापदंडात (लिडरशीप) सर्वोत्तम अशी कामगिरी केल्याचे या कंपनीने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

राज्याला इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हा पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी या कंपनीने देशातील 29 राज्यांची आर्थिक स्थिती आणि उत्पादकता, मनुष्यबळ आणि रोजगार क्षमता, टेक्नॉलॉजी, आणि इनोव्हेशन, प्रशासकीय सुलभता, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीची उपलब्धता आदी घटकांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यात मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य हे उल्लेखनिय कार्य करत असल्याचे आढळून आले.

फ्रॉस्ट ॲण्ड सॅलिव्हन कंपनी गेल्या पंधरा वर्षांपासून देशातील उत्कृष्ट शंभर उत्पादन संस्थेचा विविध स्तरावर अभ्यास करते. यावर्षी केलेल्या पाहणीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकवल्याचे गुरुवारी मुंबई येथे कंपनीच्या पुरस्कार सोहळ्यात जाहीर करण्यात आले. फ्रॉस्ट ॲण्ड सॅलिव्हन कंपनीच्या १५ व्या वार्षिक सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget