राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई (१४ डिसेंबर २०१८) : राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले असून आज चर्नी रोड परिसरातील चंदनवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी
माजी खासदार विलास मुत्तेमवार,अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, सचिव अनुपकुमार, सहसचिव संजय उबाळे यांनी माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार
यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देऊन शोकभावना व्यक्त केल्या.

तत्पूर्वी त्यांच्या अंत्यदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे लोकायुक्त एम.एल.तहलयानी, मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह विभागाचे
अतिरिक्त मुख्य सचिव सुनिल पोरवाल, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, प्रधान सचिव भुषण गगराणी, मुंबई महापालिका आयुक्त अजोय
मेहता, प्रधान सचिव प्रवीण दराडे, प्रधान सचिव नंद कुमार, प्रधान सचिव अनुप कुमार, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागाचे सचिव, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मुख्य सचिव, महानगर पालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनातील सनदी अधिकारी, सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget