(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ज्येष्ठ पत्रकार कृ. पां. सामक यांचे निधन | मराठी १ नंबर बातम्या
" />

ज्येष्ठ पत्रकार कृ. पां. सामक यांचे निधन

मुंबई (१९ डिसेंबर२०१८) : ज्येष्ठ पत्रकार व मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णराव पांडुरंग उर्फ कृ. पां. सामक यांचे आज वृद्धापकाळाने ठाणे येथे निधन झाले. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.

कृ. पां. सामक यांनी काही काळ कापड गिरणीत नोकरी केली होती. मात्र स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या सांगण्यावरून त्यांनी पत्रकारितेचा प्रारंभ केला. 1945 साली सांगली येथील साप्ता. विक्रममध्ये त्यांनी लिखाण केले. त्यानंतर त्यांनी, प्रभात, लोकमान्य, गावकरी, नवशक्ती, लोकसत्ता या दैनिकांत काम केले. लोकसत्तामधून मुख्य वार्ताहर म्हणून 1980 रोजी ते निवृत्त झाले. राजकीय आणि सामाजिक जाण असलेला पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. 1970-1971 या काळात ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दितच मुंबई मराठी पत्रकार संघ आणि शेजारील प्रेस क्लब या दोन संस्थांना आझाद मैदान येथे वास्तू मिळवून घेण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांच्या पुढाकारानेच मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची स्थापना झाली. सामक यांना `चंद्रकांत व्होरा, `अनंत हरि गद्रे', `ग. गो. जाधव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 2 मुली, 2 जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.


ज्येष्ठ पत्रकार कृ. पां. सामक यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार आणि मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे संस्थापक कृ. पां. सामक यांच्या निधनाने स्वातंत्र्योत्तर काळात मराठी पत्रकारितेच्या पिढ्या घडविणारा सच्चा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, राष्ट्रवादी जाणिवांच्या प्रेरणेतून पत्रकारितेत आलेल्या सामक यांनी प्रभात, लोकमान्य, क्रांती, लोकसत्ता, नवशक्ती, गावकरी या दैनिकांच्या माध्यमातून केलेली पत्रकारिता ध्येयवादी होती. त्यासोबतच पत्रकारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ आदी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणाऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget