(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय (२० डिसेंबर २०१८) : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 मध्ये सुधारणा | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय (२० डिसेंबर २०१८) : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 मध्ये सुधारणा

बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांनी यंत्रसामग्रीसाठी वापरलेल्या स्व-निधीवरही भांडवली अनुदान

मुंबई (२० डिसेंबर २०१८) : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाचा लाभ अधिकाधिक घटकांना व्हावा यासाठी त्यामध्ये काही सुधारणा करण्यास आज झालेल्या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांमुळे बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांनी यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरलेल्या स्व-निधीवरही भांडवली अनुदान मिळणे शक्य होणार आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारने पुढील पाच वर्षासाठी वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले होते.

आजच्या सुधारणांमुळे वस्त्रोद्योग घटकांना पूर्वीच्या किंवा नवीन वस्त्रोद्योग धोरणातील योजनांच्या लाभाचा पर्याय देणे, काही तरतुदी वगळणे, अतिरिक्त अनुदान, स्वनिधीवर भांडवली अनुदान आदी फायदे देता येणार
आहेत. त्यानुसार दि. 1 ऑगस्ट 2017 ते 14 फेब्रुवारी 2018 या कालावधीत दीर्घ मुदत कर्ज मंजूर झालेल्या प्रकल्पांसह यंत्रसामग्रीच्या खरेदीचे आदेश दिलेल्या स्व-अर्थसहाय्यित प्रकल्पांना वस्त्रोद्योग धोरण 2011-17
किंवा वस्त्रोद्योग धोरण 2018-23 मधील योजनांचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन धोरणामधील कंपोझीट युनिटची व्याख्या, भांडवली अनुदान आणि विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पांना कंपोझीट युनिटसाठी अतिरिक्त अनुदान यासंबंधीच्या तरतुदी वगळण्यात आल्या आहेत. त्याऐवजी राज्यातील सर्व विभागांतील प्रकल्पांना पुढील व मागील प्रक्रिया प्रकल्प (Forward/Backward Integration) स्थापन केल्यास पाच टक्के अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वस्त्रोद्योग धोरण 2018-23 मधील व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान योजनेंतर्गत बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांनी यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरलेल्या स्व-निधीवरही भांडवली अनुदान मिळणार आहे. विस्तारित प्रकल्प किंवा अस्तित्वातील प्रकल्पाने मागील आर्थिक वर्षाच्या स्थापित यंत्रसामग्रीच्या पुस्तकी किंमतीच्या (Book Value of Machinery) 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त यंत्रसामग्री स्थापित केल्यास या गुंतवणुकीस विस्तारिकरण, विविधीकरण किंवा आधुनिकीकरण मानण्यात येईल. तसेच हे विस्तारिकरण, विविधीकरण किंवा आधुनिकीकरण पुढील-मागील प्रक्रियेसह असणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget