(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद | मराठी १ नंबर बातम्या
" />

मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद

नागपूर (१० डिसेंबर २०१८) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी काटोल तालुक्यातील कोंडासावळी या गावाच्या भेटी दरम्यान शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधला. कोंडासावळी परिसरातील शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे शेतीला झालेला प्रत्यक्ष लाभ तसेच कर्जमाफी योजना, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळालेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

कोंडासावळी या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून शेती व शेतातील उत्पादनामध्ये झालेला सकारात्मक बदल, विविध योजनांचा मिळत असलेला लाभ याबद्दलही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनमोकळी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस कौटूंबिक कार्यक्रमानिमित्त कोंडासावळी येथे आले होते. त्यादरम्यान शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला.

युवा शेतकरी राकेश कोठाडे व चंद्रशेखर कडू यांनी जलयुक्त शिवारच्या कामामुळे तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या संत्रा व मोसंबीच्या बागांना कसा फायदा झाला याबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगितले. जलयुक्त शिवार
योजनेमध्ये लोकसहभागासाठी युवा शेतकरी पुढाकार घेत असल्याचेही यावेळी सांगितले. ग्रामस्थांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांना विविध कामासंदर्भात निवेदन दिले.

यावेळी डॉ. राजू पोतदार, काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, उपसभापती योगेश चापले, अविनाश ठाकरे, दिलीप ठाकरे आदीसह कोंडासावळी येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत संवाद साधताना विविध योजनांच्या लाभाबद्दल माहिती दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget