(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्राच्या प्रियंका अग्रवाल यांना ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग’ पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या
" />

महाराष्ट्राच्या प्रियंका अग्रवाल यांना ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग’ पुरस्कार

नवी दिल्ली (१५ डिसेंबर २०१८) : मुंबई येथील विशबेरी कंपनीच्या सह संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका अग्रवाल यांना उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडु यांच्या हस्ते आज येथे निती आयोगाचा मानाचा ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

निती आयोगाच्यावतीने आज येथील प्रवासी भारतीय भवनात ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार-2018’ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विविध उद्योग क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील 15
महिलांना यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील निवासी समन्वयक युरी अफान्सीव यावेळी उपस्थित होते.

मुंबई येथील ‘विशबेरी’ ही सृजनात्मक कार्यास क्राऊड फंडींग तत्वावर निधी उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. प्रियंका अग्रवाल यांच्या पुढाकाराने 2012 मध्ये संस्थेची स्थापना झाली. कंपनीने आतापर्यंत शंभराहून अधिक प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला असून ऑनलाईन निधी उपलब्ध करून देणारी ही देशातील आघाडीची व यशस्वी कंपनी आहे. सृजनात्मक विज्ञान प्रकल्प, लो बजेट चित्रपट, गेम शो, म्युजिक व्हिडीयोज,नृत्य उत्सव आदिंना या संस्थेने आर्थिक मदत केली आहे. 33 वर्षीय प्रियंका अग्रवाल यांनी व्यवसाय आणि अभियंता शाखेची पदवी प्राप्त केली असून विशबेरी या कंपनीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या स्वप्न पूर्तीसाठी मोलाची मदत केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून निती आयोगाच्या ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. देशातील उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिलांसाठी निती आयोगाच्यावतीने 2016 मध्ये ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्कार’ सुरु करण्यात आला.यावर्षीच्या पुरस्कारासाठी ‘महिला व उद्योजकता’ ही संकल्पना ठेवण्यात आली होती.

निती आयोगाकडे यावर्षी देशभरातून 2300 आवेदन प्राप्त झाली. विविध चाचण्यांमधून 15महिलांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यापूर्वी वर्ष 2017 मध्ये उस्मानाबाद येथील कमल कुंभार, नागपूरच्या हर्षिनी कन्हेकर आणि सातारा जिल्ह्यातील संगीता कांबळे या महाराष्ट्रातील तीन महिला उद्योजिकांना ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget